Home > Politics > भाजप नेत्यांनी बंद बाबत बोलण्याऐवजी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केली असती तर बरं झालं असत- आव्हाड

भाजप नेत्यांनी बंद बाबत बोलण्याऐवजी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केली असती तर बरं झालं असत- आव्हाड

भाजप नेत्यांनी बंद बाबत बोलण्याऐवजी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केली असती तर बरं झालं असत- आव्हाड
X

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिनही पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला. या बंदमध्ये लोकांनी स्वेच्छेने सहभाग घेतला आहे असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तर आजचा बंद हा पूर्णपणे फसला आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, बंद यशस्वी झाला , झाला नाही यावरून महाविकास आघाडी आणि भाजपध्ये राजकारण रंगले असताना भाजपला सत्तेचा माज आहे, हे लखीमपूर घटनेमधून दिसतेय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. दरम्यान बंद फसला म्हणणाऱ्यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे कारण ते विरोधात आहे , सरकारमधील पक्षांनी बंद पुकारल्याने त्यांना तसे बोलवे लागते मात्र त्यांनी उत्तर प्रदेशातील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केली असती तर बरं झालं असतं, म्हणजे निदान त्यांची माणुसकी दिसली असती असा टोला आव्हाड यांनी लगावला.

Updated : 11 Oct 2021 7:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top