सनातन धर्म महाराष्ट्रद्रोही आहे, जितेंद्र आव्हाड आपल्या वक्तव्यावर ठाम
सनातन धर्म म्हणजे महाराष्ट्र द्रोही या वक्तव्यावर मी ठाम असल्याचे जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा म्हणाले.
X
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad on Sanatan Dharma) यांनी सनातन धर्म म्हणजे महाराष्ट्रद्रोही असे वक्तव्य केले होते. त्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सनातन धर्म हा महाराष्ट्रद्रोही आहे, या वक्तव्यावर मी ठाम आहे. कारण सनातन धर्माला भगवान बुध्द (Bhagvan Buddha), भगवान महावीर (Bhagvan Mahaveer), संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar), संत बसवेश्वर (Sant Basaveshwar), चक्रधर स्वामी (Chakradhar Swami), संत तुकाराम (Sant Tukaram) हे सगळे सनातन धर्माच्या विरोधात होते. सनातन धर्माला मानणाऱ्या लोकांनीच संत तुकाराम महाराजांच्या गाथा फाडल्या, फेकून दिल्या. सनातन धर्माच्या विरोधातच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि स्त्रियांना शिक्षणाची दारं खुले करून देणारे महात्मा फुले (Mahatma Phule) उभे राहिले.
शोषित, वंचित, दलितांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका घेत राजर्षी शाहू महाराज (Rajarshee Shahu maharaj) सनातन धर्माच्या विरोधात उभे राहिले. ज्यांनी सनातन निर्माण केला त्या मनूची मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी जाळून टाकली. ज्या सनातन धर्मामुळे दलितांना पाण्याला स्पर्श करता येत नव्हता त्या पाण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन केले. ज्या सनातन धर्मामुळे बहूजनांना देवळात जाता येत नव्हतं त्यांच्याविरोधात आंदोलन करून काळाराम मंदिर खुलं करून घेतलं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.या देशातील जातीयव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला आणि येथील बहूजनांना सर्वांपासून लांब ठेवणारा बहूजन धर्म होता. मात्र संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन धर्माविरोधात अंतिम खिळा ठोकला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.