जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार, सातारा, पुणे जिल्हा बँकेला ED ची नोटीस, अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा?
X
जरंडेश्वर कारखाना कर्ज वाटप प्रकरणी पुणे आणि सातारा जिल्हा सहकारी बँकांना ED ने नोटीस धाडली आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकने तब्बल 200 कोटी आणि सातारा जिल्हा सहकारी बँकेने 96 कोटीच कर्ज जरंडेश्वर कारखान्यांना दिलं आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा आहे. ह्या प्रकरणात आता ईडी सखोल चौकशी करणार आहे, या दोन सहकारी बँकांना आता ईडी समोर आवश्यक ते कागद पत्र सादर करण्यास सांगितले आहे. व्यवहार कसा झाला कर्ज कसं दिलं, बँक संचालक मंडळाने काय निर्णय घेतले? या सर्व बाबी ईडी समोर ठेवाव्या लागतील? ह्या कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ED) ने गेल्याच आठवड्यात जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला होता. कारखान्यावर कार्यवाही केल्यानंतर आता ज्या बँकांनी जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिले होते. त्या बँकांना ईडीने नोटीसा पाठवल्या आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन्ही बँकांना जरंडेश्वर कारखाना कर्ज प्रकरणी नोटीसा दिल्या असून आता चौकशी साठी आवश्यक ती कागदपत्र मागवली आहेत. सातारा जिल्हा बँक राष्ट्रवादी च्या ताब्यात आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस च्या अडचणीही वाढल्या आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 200 कोटीचं कर्ज जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलं आहे. या कर्जवाटप प्रकरणी चौकशीसाठी आवश्यक ती कागदपत्र ईडीने मागवली आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण
ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या कारखाना शी थेट संबंध जोडला जातोय.
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉडरिंग विरोधी कायद्यान्वये ईडी ने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता.
2010 मध्ये जरंडेश्वर कारखाना खरेदी करण्यात ला त्यावेळेस त्याचे मूल्य 65 कोटी 75 लाख इतके होते. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्यांची जागा इमारत, कारखाना, व जप्त करण्यात आली.
राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हाही दाखल केला होता. नंतर 2019 जरंडेश्वर कारखाना विरुद्ध पीएमएलए चा गुन्हा दाखल झाला आहे. तसंच तेव्हाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी कमी किंमतीत आपल्याच नातेवाईकांना विकला.
अजित पवारांचा संबंध आहे का ?
जरंडेश्वर साखर कारखाना विरुद्ध केलेल्या कारवाही नंतर ईडीने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 2010 मध्ये नियमांचे पालन न करता विकून टाकला, लिलावात कारखान्यांची किंमत कमी दाखवली, तत्कालीन सहकारी बँकेच्या संचालक मंडळात अजित पवार हेही होते. हा कारखाना गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ने विकत घेऊन ,लगेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.लिजवर दिला, विशेष म्हणजे स्पार्कलिंक सॉईल प्रा.लि. कंपनीकडे जरंडेश्वर कारखानाचे सर्वाधिक शेअर्स आहेत. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कंपनीशी संबंधीत असल्याचा दावा ईडीने केला आहे. कारखान्याच्या नावाने बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज ही उचलले आहे असं ही ईडीने दावा केला आहे.
राज्य शिखर सहकारी बँकेच्या घोटाळ्याची पुन्हा चर्चा
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. बँकेच्या संचालक मंडळात सर्वाधिक राष्ट्रवादीचेच बडे नेते होते. पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री असतांना चौकशीचे आदेश दिले होते. ह्याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीमध्ये वाद झाले होते. बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा भाजपने हाच मुद्दा पकडून 2014 मध्ये सत्तेत आली होती. मात्र, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या चौकशी नंतर 65 जणांना क्लीन चिट देण्यात आली होती. मागील वर्षी मुंबई उच्च नायालयात क्लोजर रिपोर्ट रिपार्ट ही सादर करण्यात आला होता. मात्र, त्याविरुद्ध जरंडेश्वर कारखान्याच्या संचालिका व माजी मंत्री शालिनीताई पाटील प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती. हीच याचिका राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची पुन्हा फाईल ईडीने ओपन केलीय का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.