फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या रश्मी शुक्ला फडणवीस यांच्या भेटीला
फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी रात्री भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
X
राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापुर्वीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा करावी, अशी मागणी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
2014-19 या काळात राज्यात फडणवीस सरकार असताना रश्मी शुक्ला गृह विभागात कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले, संजय राऊत, बच्चू कडू यांच्यासह महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे तात्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान राज्यातील सरकार बदललं आहे. त्यापार्श्वभुमीवर रश्मी शुक्ला यांनी बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांना पुन्हा महाराष्ट्रात बोलवले जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र सध्या रश्मी शुक्ला या हैद्राबादमध्ये नियुक्तीवर आहेत.
रश्मी शुक्ला यांच्यापाठोपाठ मोहित कंबोज 'सागर' वर
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांतर भाजप नेते मोहित कंबोज सागर बंगल्यावर दाखल झाले. मोहित कंबोज यांनी तीन ट्वीट करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरूंगात जाणार असल्याचे ट्वीट केले होते. तसेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा नेता अजित पवार असणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यातच रश्मी शुक्ला यांनीही फडणवीस यांची भेट घेतल्याने सिंचन घोटाळ्याची पानं पुन्हा उचकली जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
मात्र फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.