एंकर जरूर चुनाव लड़ेंगे!
X
सध्या सहा राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीची चर्चा विविध माध्यमांवर होतांना दिसत आहे.
यादरम्यान वार्तांकन करणारे anchor राजकीय पक्षांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच शेतकरी नेते राकेश टीकेत यांनी आज तक या हिंदी चॅनेलवर "पंचायत आज तक लखनऊ" या कार्यक्रमात "अँकर चुनाव लढेंगे" असं म्हणत माध्यमांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. आज तकच्या चित्रा त्रिपाठी यांनी राकेश टिकेत यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत आज तकच्या यूट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.
या मुलाखतीत ११ व्या मिनिटावर उत्तर प्रदेश मधील वाढत्या वीज बिलासंदर्भात अंकर चित्रा त्रीपाठी आणि राकेश टिकेत यांच्यात संवाद सुरू असतांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वीज बिलाचा सामना करावा लागत असल्याचे राकेश टीकेत सांगत असताना अॅकर चित्रा त्रिपाठी म्हणाल्या, सरकारने तर शेतकऱ्यांना सूट दिली आहे. यावर टिकेत म्हणाले, " सरकार म्हटलंय की शेतकऱ्यांना सूट देणार. पण आता ही सूट एक महिन्याची आहे की, दोन महिन्यांची, की निवडणूक होईपर्यंतची!"
यासंदर्भात, अँकर चित्रा त्रिपाठी यांनी दुसरा प्रश्न विचारला, अखिलेश यादव यांनी 300 युनिट वीज फ्री देण्याचं म्हटलं आहे. यावर टीकेत म्हणाले, जेव्हा त्यांचे सरकार येईल तेव्हा बघितलं जाईल. जर त्यांनी नाही केलं तर त्यांच्या विरोधात देखील आंदोलन केली जातील.
दरम्यान, 'तुम्ही निवडणूक लढत आहात का?' असा प्रश्न चित्रा त्रिपाठी यांनी केला असता, टिकेत यांनी अँकर चित्रा त्रिपाठी यांना चांगलंच घेरलं आणि म्हणाले, " नाही मी निवडणूक लढवत नाही मात्र, या वेळेस काही अँकर नक्कीच निवडणूक लढवतील" असं म्हणत टिकेत यांनी गोदी मीडिया कडे बोट दाखवत माध्यमांना चांगलंच घेरण्याचा प्रयत्न केला.
टिकेत असंही म्हणाले, "कशाला त्रास घेताय...घरचेच चॅनल आणि घरचाच पक्ष बनवा ना ! " यावर "माध्यमांना तुम्ही चांगलंच निशाण्यावर धरलंय... राकेश टीकेत यांना आता घाबरावं लागेल! " अशी विचारणा चित्रा त्रीपाठी यांनी टिकेत यांना केली असता, " तुम्हाला कोणीतरी शिकवलंय, मला पाच माध्यमांनी सारखाच प्रश्न विचारला, म्हणजे नक्कीच कुठून तरी शिकून आला आहात तुम्ही" असं टिकेत यांनी म्हटलं.
सध्या सोशल मीडियावर या मुलाखतीतला हा भाग चांगलाच व्हायरल होत आहे. इमानदार Hell wala या ट्विटर अकाउंट ने हा व्हिडिओ शेअर केला आहे.