सरस्वती देवी प्रकरणात मुद्दाम त्रास देण्याचे प्रयत्न सुरू – छगन भुजबळ
X
सत्यशोधक समाजाचा कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार प़डला होता. त्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात छगन भुजबळ यांच्याविरोधात मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भात छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी मुद्दाम त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं भुजबळ म्हणाले.
यावेळी, "माझ्यावर गुन्हा दाखल करणारे हे ललितचंद टेकचंदानी य़ांनी १० वर्षे माझ्यासोबत काम केलं आणि गेली १० वर्षे शतृत्व पत्करलं. ललितचंद टेकचंदानी ने अगोदर पण माझ्यावर असेच गुन्हे दाखल कऱण्याचं काम केलं आहे. २०१४ ते २०२१ या काळात त्यांनी दाखल केलेल्या केसेस पैकी काही केसेसे निघत आहेत आणि काहींबद्दल आम्ही प्रय़त्न करत आहोत. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की या व्यक्तीशी आपण संबंध ठेवायचा नाही. त्यांचा नंबर डीलिट करून टाकला.
अनेक जण मला मेसेजेस करत असतात मी त्यांचे नंबर डिलीट करतो पण एका नंबर वरून सतत मेसेजेस... मी माझ्या सहकाऱ्याला सांगितलं बग रे बाबा कोण आहे फार त्रास देत आहे. माझ्या सहकाऱ्याने त्याला फोन केला पण त्याने फोन काही उचलला नाही. मग चॅटींगवर आम्ही बोललो. मी त्याला म्हणालो तुझा पत्ता सांग आम्ही भेटायला येतो आपण चर्चा करू पण ते काही घडलं नाही. मी स्वतः काही त्याला फोन केला नाही. त्याला व्हॉट्स ऍप केला नाही. जिवे मारण्याची धमकी तर दिलीच नाही. मग आमच्या कर्यकर्त्यानेही त्याकडे दुर्लक्ष केलं.
सध्या जे सरस्वती देवीचं प्रकरण सुरू आहे त्यामध्ये जाणून बुजून भुजबळांना त्रास द्यायचा, त्यांना बदनाम करायचं. या हेतुने त्यांनी हे सगळं केलेंलं आहे. गेल्या ८ वर्षांपासून माझा त्या व्यक्तीचा संबंधच नाही. यासह प६कार परिषदेत त्यांनी व्यापऱ्याचा फोटो धाकवला. मुंबइला गेल्यावर मी वकीलाशी बोलेन, मी माझी बाजू शासनाला कळवलेली आहे. आणि लोकांना देखील आता बातम्यांमधून कळेलच.", असं भुजबळ म्हणाले.