Home > Politics > 'या' निवडणुकीत भाजपने केले महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान; महाविकास आघाडीने मारली बाजी

'या' निवडणुकीत भाजपने केले महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान; महाविकास आघाडीने मारली बाजी

या निवडणुकीत भाजपने केले महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान; महाविकास आघाडीने मारली बाजी
X

अकाेला अकोला जिल्हा परिषदेतील दाेन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे महाविकासच्या दाेन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केले आहे.या निडणुकीत वंचितला 24 तर महाविकास आघाडीला 29 मते मिळाली. तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्फूर्ती गावंडे तर विषय समिती सभापतीपदी अपक्ष सदस्य सम्राट डाेंगरदिवे विजयी झाले. सर्वाधिक सदस्य संख्या असूनही पराभव झाल्याने हा निकाल सत्ताधारी वंचितसाठी धक्का मानला जात आहे.

जानेवारी 2020 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्या होत्या, मात्र ओबीसीच्या आरक्षणावरून सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. 4 मार्च राेजी न्यायालयाने ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त हाेणार नाही,असे स्पष्ट केल्याने या जागाच रिक्त झाल्या हाेत्या. त्यामुळे 5 ऑक्टाेबर राेजी मतदान झाले आणि 6 ऑक्टाेबर राेजी निकालही जाहीर झाला हाेता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतींच्या दाेन जागांसाठी काल शुक्रवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

पाेट निवडणुकीनंतर वंचितचे संख्याबळ 23 झाले आहे. शिवसेना-13, भाजप-5, काँग्रेस-4 राष्ट्रवादी काँग्रेस-4 प्रहार जनशक्ती पक्ष 1 व तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यापैकी एका अपक्ष सम्राट डाेंगरदिवे यांनी महाविकास आघाडीकडून सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आणि भाजपने प्रहारला पाठिंबा दिल्याने महिला व बालकल्याण सभापती पद स्फूर्ती गावंडे यांच्याकडे आले असून विषय समिती सभापतीसाठी सम्राट डाेंगरदिवे अविराेध निवडून आले.

Updated : 30 Oct 2021 8:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top