आमच्या हाती ED दिली तर फडणवीस सुध्दा शिवसेनेला मतदान करतील- संजय राऊत
X
राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणूकीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर शिवसेनेने या निवडणूकीत पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणूकीसंदर्भात देशभरातील 22 नेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. तर या बैठकीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल चर्चा होणार आहे. मात्र यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांची नावं घेतली.
संजय राऊत यावेळी म्हणाले की, ज्या आमदारांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना मतदान केले नाही. त्या गद्दारी केलेल्या आमदारांची नावं मी सांगितले. त्या आमदारांबद्दल आमच्या ज्या काही भावना आहेत. त्या भावना आम्ही व्यक्त केल्या. त्यामुळे त्या आमदारांचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. आमच्या हाती 2 दिवस ईडी दिली तर अपक्षच काय देवेंद्र फडणवीस सुध्दा शिवसेनेला मतदान करतील, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला संजय राऊत यांचे उत्तर
सामनाच्या रोखठोक सदरातून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची टीका करण्यात आली होती. त्यावर बोलताना पंकजा मुंडे या भाजपच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहेत. त्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यास समर्थ आहे. इतरांनी काळजी करू नये, असे मत व्यक्त केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याविषयी चिंता करण्याचा अधिकार आम्हाला आहे. कारण महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली शिवसेना भाजप युती टिकवण्यामध्ये मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याविषयी काळजी करण्याचा आम्हाला पुर्ण अधिकार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
ममता बॅनर्जी यांचे 22 नेत्यांना पत्र
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणूकीसंदर्भात 22 नेत्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. मात्र या बैठकीला शिवसेनेकडून एखादा प्रतिनिधी उपस्थित राहील, असं संजय राऊत यांनी सांगितले.