Home > Politics > मी सोम्या गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही: अजित पवार भडकले

मी सोम्या गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही: अजित पवार भडकले

मी सोम्या गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही: अजित पवार भडकले
X

मी सोम्या गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी पवारांनी केलेल्या ट्विटवरुन माध्यमांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) सातारा (satara) जिल्ह्यातील माण तालुक्यात आले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांवर पवार यांनी उत्तर देताना राणेंवर माेजक्या शब्दांत टीका केली. (ajit pawar latest news) दरम्यान पत्रकारांवर अजित पवार आज थाेडे नाराज असल्याचे दिसून आले. कार्यक्रमापुर्वी देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद टाळला. कार्यक्रमानंतर देखील पवार यांनी माेजक्याच प्रश्नांना उत्तर दिले.

साता-याच्या एमआयडीसी मधील खंडणीबाबत मंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात काेणाचा ही विशेष उल्लेख न करता समाचार घेतला. त्याचा धागा पकडत काही माध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री पवार यांना साता-याच्या एमआयडीसीतील खंडणीखोर कोण असा प्रश्न केला. त्यावर मंत्री पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी तुम्हांला माहित नाही असे विचारताच प्रतिनिधींनी नाही म्हटले. त्यावर मंत्री पवार यांनी कधी तरी खरं बाेलायला शिका अशी टिप्पणी केली.

Updated : 12 Jun 2022 5:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top