Home > Politics > राम शिंदे यांनी १० वर्षात किती विकासकामे केली - रोहित पवार

राम शिंदे यांनी १० वर्षात किती विकासकामे केली - रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राम शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडले. त्यांनी आपल्या मतदारसंघात १० वर्षात किती कामे केली याची माहिती द्यावी आणि नंतर विकासाच्या गप्पा माराव्यात असे टोला शिंदे यांना लगावला.

राम शिंदे यांनी १० वर्षात  किती विकासकामे केली - रोहित पवार
X

भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे गेल्या १० वर्षा पासून आमदार आहेत. त्यांनी विकासासाठी आपल्या मतदारसंघात काहीही केले नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले. मी तिथे आमदार झाल्यानंतर किती विकास कामे झाली आहेत ही तपासून पाहावी, असा सल्ला पवार यांनी शिंदे यांना दिला. राम शिंदे आमदार असताना त्यांनी विकासाची कामे फक्त आपल्या घराच्या लॉनवर मांडण्याचे काम केले असल्याची टिका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली.

मागच्या दरवाजाने एन्ट्री करून आमदार झाल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व त्यांचे निलंबन केले जात असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी लगावला. लोकांची मते रोहित पवारांकडे ( Rohit Pawar) असल्यामुळे त्यांच्या कारखान्यावर कारवाई करा. त्यांच्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, असे आदेश राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार देत असल्याचा आरोप पवार यांनी केला. बीजेपी ( BJP) ची सत्ता असल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. आता आमच्या कारखान्याच्या डायरेक्टरवर पोलीस केस करण्यात आली आहे. बीजेपीच्या काळातील चौकशी सुरु होती आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरही केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. आता असे बोलले जात आहे की, माझ्यावरती कारवाई होईल. पण मी अशा कारवाईला घाबरत नाही, असे पवार यांनी ठणकावून सांगितले.

आम्ही लोकांच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडत राहणार आणि मतदार संघातील हिताबाबत बोलत राहू, एखाद्या मंत्र्यांने चुकीची कामे केली आणि सत्तेत असेल तर त्याच्यावर कारवाई होत नाही. पण विरोधकांवर कारवाई करतात. याचा हिशेब द्यावा लागेल, असे पवार म्हणाले. आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा असल्याचे पवार यांनी सांगत, बीजेपी (BJP) चे मुंबईचे प्रमुख शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात कोर्टात गेले आहेत. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर काय होईल, हे बघण्यासारखी गोष्ट असणार असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) यावेळी म्हणाले.

Updated : 10 March 2023 12:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top