पहाटेची स्वप्नं खरी ठरतात, असं उगाच म्हणत नाहीत !
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. सरकार टिकवण्यासाठी विधिमंडळात आकड्यांचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. काय काय शक्यता असू शकतात याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी...
X

एक शक्यता अशी आहे -
दोन तृतीयांश आमदार, म्हणजे ३६ आमदार एकनाथ शिंदेंकडे असतील, असे वाटत नाही.
(तसे असतील तर मग मुद्दाच नाही!)
पण, एकनाथ शिंदेंकडे असणारे आमदार लक्षात घेता, आता महाविकास आघाडीही अल्पमतात आली आहे.
त्यांच्याकडे आता बहुमताचा आकडा १४४ नाही.
त्यामुळे सरकारला सभागृहात राजीनामा द्यावा लागेल.
पुन्हा काही काळ कोश्यारी आजोबांचे राज्य येईल.
त्यानंतर काय होईल?
भाजपकडेही 'मॅजिक फिगर' नाही.
१३४ आमदार भाजपसोबत आहेत, असे दिसते. विधानपरिषद निवडणुकीने ते स्पष्ट केले.
त्यामुळे १३४ हाच बहुमताचा आकडा होईल, यासाठी भाजप प्रयत्न करेल.
म्हणजे विधानसभेत २६७ आमदार असायला हवेत.
एकनाथ शिंदे गटाचे सुमारे २० आमदार राजीनामा देतील आणि भाजप बहुमत सिद्ध करेल, असे दिसते.
एकनाथ शिंदेंकडे ३६ आमदार असतील, तर मग विषयच संपला. मग, देवेंद्र सीएम आणि शिंदे उपमुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल.
यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बघ्याची भूमिका घेईल, असे गृहीत धरले आहे. प्रत्यक्षात, 'बघताय काय, सामील व्हा!', असाही नारा ते देऊ शकतात.
पहाटेची स्वप्नं खरी ठरतात, असं उगाच म्हणत नाहीत.
पहाटेची स्वप्नं खरी ठरतात, असं उगाच म्हणत नाहीत !