काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर गुलाम नबी आझाद यांची मोठी घोषणा
काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यांनी नवा पक्ष काढणार असल्याचे म्हटले आहे.
X
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोठी नवा पक्ष काढण्याची घोषणा केली आहे.
यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, आम्ही स्थापन करत असलेला नवा पक्ष हा जम्मू काश्मीरमधील निवडणूकीच्या दृष्टीकोणातून स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मला कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची घाई नसल्याचेही यावेळी आझाद म्हणाले.
गुलाम नबी आझाद हे G-23 गटातील नाराज नेत्यांपैकी एक
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या 23 नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष संघटनेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्षाला गांधी घराण्याव्यतिरीक्त अध्यक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा 23 नेत्यांचा समूह चर्चेत आला. मात्र त्यानंतर यापैकी जितीन प्रसाद यांनी भाजपची वाट धरली तर ज्येष्ठ वकील कपील सिब्बल समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तर त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
G-23 समूहात कोणाचा समावेश होता?
काँग्रेस नेतृत्वावर टीका करणाऱ्या G-23 गटात कपील सिब्बल, गुलाम नबी आझाद, शशी थरूर, मनिष तिवारी, आनंद शर्मा, पीजे कुरियन, रेणूका चौधरी, मिलिंद देवरा, मुकूल वासनिक, भूपेंद्र सिंह हुड्डा, राजिंदर कौर भट्टल, एम वीरप्पा माईली, अजय सिंह, राज बब्बर, कौल सिंह ठाकुर, अरविंदर सिंह लवली, अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, विवेक तनखा, संदीप दिक्षीत आणि योगानंद शास्री यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रबळ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. मात्र त्यापैकी कपील सिब्बल, गुलाम नबी आझाद, जितीन प्रसाद आणि योगानंद शास्री यांन पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.