Gujrat Election 2022 : अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीबाबत केली मोठी घोषणा
गुजरात निवडणूका तोंडावर आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह आम आदमी पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातच आम आदमी पक्षाने गुजरातच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली आहे.
X
Arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी गणपती (Ganpati) आणि लक्ष्मीचे (Lakshmi) फोटो रुपयावर मुद्रीत करण्याची मागणी केली होती. त्यावरून केजरीवाल यांच्यावर सर्वपक्षांकडून सडकून टीका झाली. त्यानंतर गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षातर्फे (Aam Adami party) गुजरातच्या मुख्यमंत्री (Gujrat CM)पदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीबाबत महत्वाची घोषणा केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये वारंवार मुख्यमंत्री बदलले जात आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे? ते आपल्याला माहिती नाही. याबरोबरच आनंदीबेन पटेल (Anandiben patel), विजय रुपाणी (Vijay rupani)आणि भुपेंद्र पटेल (Bhupendra patel)यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. पण गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला पाच वर्षे पुर्ण का होऊ दिले जात नाहीत? यामागे हे लोक भ्रष्टाचार करतात म्हणून बदलले जातात का? याविषयी माहिती नाही. पण आम आदमी पक्ष गुजरातमध्ये लोकशाही पध्दतीने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड करणार आहे.
गुजरातमधील नागरिकांनी 6357000360 या क्रमांकावर संपर्क करून गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदी कोण असावं? याविषयी मेसेज (message),ऑडिओ मेसेज (Audio message)किंवा व्हॉट्सअॅप मेसेज यांच्या माध्यमातून सूचना कराव्यात. तसेच [email protected] च्या माध्यमातूनही गुजरातमध्ये आपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा? हे सूचवावे, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, नागरिकांनी 3 नोव्हेंबरपर्यंत या क्रमांकावर आणि gmail वर आपलं मत नोंदवावं. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी आप गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.