Home > Politics > राज्यपालांकडून पुन्हा महापुरुषांचा अवमान, अमोल मिटकरींनी केला नवीन व्हिडिओ ट्विट...

राज्यपालांकडून पुन्हा महापुरुषांचा अवमान, अमोल मिटकरींनी केला नवीन व्हिडिओ ट्विट...

राज्यपालांकडून पुन्हा महापुरुषांचा अवमान, अमोल मिटकरींनी केला नवीन व्हिडिओ ट्विट...
X

"आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहिए, लेकीन मेरे घर में नही, दुसरों के घर में होने चाहिए…" असं म्हणत आता पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह (Chhatrapati Shivaji Maharaj) इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. आणि हाच व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांचे विधान चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९ नोव्हेंबरला औरंगाबाद (Aurangabad) येथील विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांनी शिवाजीला जुन्या काळातील आयकॉन म्हटले होते. कोश्यारी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नव्या युगाचे प्रतीक असल्याचे त्यांनी मेळाव्यात सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरुवात केली. भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटानेही कोश्यारी यांच्या विधानाला विरोध केला.

आता पुन्हा एकदा राज्यपाल त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांच्या मनात नेमकं काय चाललंय? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) करतील का? असा सवाल मिटकरींनी विचारला.

राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हंटल आहे..

"आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहिए…लेकीन मेरे घर में नही… दुसरों के घर में होने चाहिए…" असं म्हणत त्यानं पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे..

अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट करत काय म्हंटल आहे..?

अमोल मिटकरी यांनी राज्यपालांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओ मध्ये त्यांनी शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. हा व्हिडिओ शिकार करत त्यांनी तिहिले आहे की, ''राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?''

Updated : 8 Jan 2023 1:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top