मनसे आमदाराचे मत कुणाला? राजू पाटील यांनी वाढवला सस्पेन्स
X
राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला असल्याचे म्हटले जात होते. मात्र विधानपरिषद निवडणूकीदरम्यान राजू पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राजू पाटील यांचे मत कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यसभा निवडणूकीतील मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला दिले असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता विधानपरिषद निवडणूकीत आपण कुणाला मत देणार आहोत याबाबत केलेल्या दाव्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांना तुमचं मत भाजपला की दुसऱ्या पक्षाला असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देतांना राजू पाटील म्हणाले की, लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. तसंच तुम्ही पाहिलं आहे की एका मताला किती महत्व आहे. त्यामुळे मला राज ठाकरे यंनी जे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मी मतदान करणार आहे, असं वक्तव्य राजू पाटील यांनी केले. त्यामुळे राजू पाटील यांच्या वक्तव्याने आणि त्यांनी निर्माण केलेल्या सस्पेन्समुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भुमिका घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यसभा निवडणूकीत भाजपला मतदान केले असल्याची चर्चा होती. तर आता विधानपरिषद निवडणूकीत मनसे आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला जाण्याचा अंदाज वर्तवला जात असताना राजू पाटील यांनी मला कुणीही गृहीत धरू नका, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत कुणाला? याबाबत सस्पेन्स आणखीच वाढला आहे.