Home > Politics > भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या “त्या” शपथविधीबाबत फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट...

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या “त्या” शपथविधीबाबत फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट...

२०१९ मध्ये भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पहाटेच्या सुमारास झालेल्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “त्या” शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी आज केला आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या “त्या” शपथविधीबाबत फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट...
X

जर तुम्हाला आठवत नसेल तर आम्ही तुम्हाला लक्षात आणून देतो की, एक पहाटेचा शपथविधी राज्यात पार पडला होता. आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. हा शपथविधी २०१९ रोजी पहाटे पार पडला होता. मात्र हे सरकार फक्त काही तासातचं कोसळले होते. त्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


२०१९ मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. अशी माहिती फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिली. या सरकार स्थापने संदर्भात ऐन वेळेला आमच्यासोबत विश्वासघात झाल्याचे सुद्धा फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी सरकार मला तुरुंगात टाकण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मला तुरुंगात टाकण्यासाठी जंग पछाडले, असा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला


उद्धव ठाकरे यांनी निवडणुका भाजपसोबत (BJP) लढवल्या. त्यावेळी झालेल्या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, राज्यात सत्ता आली तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यावेळी ठाकरे यांनी सभेदरम्यान टाळ्यासुद्धा वाजवल्या होत्या. पण ज्यावेळी ठाकरे यांच्या लक्षात आले की, आपल्याला मुख्यमंत्री होता येईल, तेव्हा त्यांनी फडणवीस यांचा फोन घेणे सुद्धा टाळले होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची इतकी लालसा होती की, ते थेट ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसले. असेही फडणवीस यांनी सांगितले. मात्र दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांना या शपथविधी बाबत एका कार्यक्रमात विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळले होते. पण आज देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधाचा जाहीरपणे खुलासा करुन राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे आगामी काळात याचा राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो. हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 13 Feb 2023 9:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top