विधानसभा अध्यक्षांना भास्कर जाधव धमकावू शकतात का?- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असतानाच सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.
X
राज्याचा २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( BUDGET SESSION 2023 ) आजपासून सुरवात झाली. या अधिवेशनादरम्यान मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सभागृहात चर्चा सुरु असताना सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव ( BHASKAR JADHAV ) यांनी 'पॉईंट ऑफ प्रोसिजर' च्या मुद्दयावरुन आक्रमक भूमिका घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी आक्षेप घेत भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा आरोप केला. फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( BUDGET SESSION 2023 ) बोलत होते.
आमदार भास्कर जाधव ( BHASKAR JADHAV ) यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही, असा आरोप करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. तसेच हे काय चाललं आहे, असा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना विचारला. यावेळी देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) हे आक्रमक झाले आणि त्यांनी " भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरु झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही," असा सवाल फडणवीस यांनी सभागृहात अध्यक्षांसमोर उपस्थित केला. "हे योग्य नाही. सगळ्यांना आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत, हे कसं चालेल," असं फडणवीस यांनी म्हटलं.