Home > Politics > Shivsena Vs Shivsena : शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Shivsena Vs Shivsena : शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. त्यातच कसबा पेठ आणि चिंचवड निवडणूकीपुर्वी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

Shivsena Vs Shivsena : शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
X

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेला. पुढे या वादावर निवडणूक आयोग निर्णय घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले. त्यानुसार निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार दोन्ही गटांनी लेखी युक्तीवाद सादर केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोग कधीही निर्णय देऊ शकते, असं म्हटलं जात असतानाच कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीपुर्वी शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत (Bow And Arrow) निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत तातडीने निर्णय घेण्यास नकार दिला आहे.

कसबा पेठ (Kasaba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या पोटनिवडणूकीसाठी (Bypoll Election) अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख आहे. त्यापुर्वी हा निर्णय येईल, अशी आशा अनेकांना होती. मात्र अंधेरी पोटनिवडणूकीपुर्वी (Andheri bypoll election) निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दिलेल्या पक्ष चिन्ह आणि नावामुळे यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जोपर्यंत सत्तासंघर्षाचा निर्णय देणार नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगही कुठलाही निर्णय देण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

शिवसेना आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने तातडीने निर्णय घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme court on Maharashtra political Crisis) होणाऱ्या सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे.

Updated : 7 Feb 2023 8:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top