एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता सोशल मीडियावर सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, टीकाही केली. बाळासाहेबांची शिवसेना असली तरी बाळासाहेब नसतानाही तुम्हाला गेल्या अडीच वर्षात काय मिळाले याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपण शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, पण बंडखोर आमदारांनी येऊन तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्हाला नको आहात असे सांगावे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे.
".1गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
एकूणच एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी चिघळणार असे दिसते आहे.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever