लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे कितव्या स्थानी? काय आहे Mood of Nation?
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Top 10 मध्ये आहेत का? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा...
X
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत भाजपसोबत जात मुख्यमंत्री पद पटकावले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारून सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता किती आहे? एकनाथ शिंदे यांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून स्वीकरलं आहे का? असा प्रश्न इंडिया टुडे - सी व्होटर (India Today - C Voter) ने केलेल्या सर्व्हेत विचारला आहे. त्यानुसार देशाचा मूड काय आहे? पहिल्या 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीत कुणी स्थान मिळवलं आहे? हे या अहवालात सांगितले आहे.
Mood of Nation अंतर्गत India Today- C Voter ने केलेल्या सर्व्हेत पहिल्या स्थानी ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (Naveen Patnaik) हे आहेत. त्यांना 73.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) हे आहेत. त्यांना 69.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी आसामचे (Asam) मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा (Cm Hemant Biswa sarma) हे आहेत. त्यांना 68.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यानंतर छत्तीसगडचे (Chhattisgad) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh baghel) हे चौथ्या स्थानी आहेत. त्यांना 55.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. पाचव्या स्थानी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj singh Chauhan) हे आहेत. त्यांना 54.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. सहाव्या स्थानी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Dhami) हे आहेत. त्यांना 53.4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. सातव्या स्थानी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आहेत. त्यांना 48.6 टक्के लोकांची पसंती आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन ( M K Stalin) हे आठव्या स्थानी आहेत. त्यांना 45.7 टक्के लोकांची पसंती आहे. यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra patel) हे नवव्या स्थानी आहेत. त्यांना 43.6 टक्के लोकांची पसंती आहे. दहाव्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR जगनमोहन रेड्डी (YSR Jagan mohan Reddy) हे आहेत. त्यांना 39.7 टक्के लोकांची पसंती आहे.
या इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्व्हेत पहिल्या दहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय ठरले नसल्याचे दिसून येत आहे.
2022 च्या सर्वेत उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) होते Top 10 च्या यादीत
22 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द झालेल्या India today - C Voter च्या सर्व्हेत तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होते. त्यांना लोकांनी 61.8 टक्के पसंती दर्शवली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन सहा महिने झाले. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत.
योगींची लोकप्रियतेला घसरण
22 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या अहवालात योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानावर होते. मात्र 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांची 48.7 टक्के लोकप्रियता होती. मात्र यंदाच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.