Home > Politics > विरोधकांना पंचामृत लोटा भरून प्यायची सवय आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

विरोधकांना पंचामृत लोटा भरून प्यायची सवय आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पंचामृत मांडले आहेत. त्यावरून टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.

विरोधकांना पंचामृत लोटा भरून प्यायची सवय आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
X

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाचे सूप वाजले. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला चांगलेच फैलावर घेतले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंचामृत मांडले आहेत. त्यावर विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. हे कसं साध्य करणार? निधी कुठून आणणार? अशा प्रकारे टीका केली जाते. मात्र विरोधी पक्षाला हे माहितीच नाही की, पंचामृत हे थोडं थोडं दिलं जातं. पण त्यांना पंचामृत नेहमी लोटा भरून प्यायचं असतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता. (CM Eknath Shinde Attack on Opposition)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅगच्या अहवालावर (Eknath Shinde on CAG report) बोलताना सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगचा अहवाल सभागृहात ठेवला. त्यामध्ये काही गंभीर ताशेरे आहेत. त्यामुळे त्याची निश्चितच चौकशी केली जाईल. त्याबरोबरच अशा प्रकारची चौकशी प्रत्येक महापालिकेची करावी, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

विरोधी पक्षाचा सभागृहावर बहिष्कार

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ये अंदर की बात है म्हणत टोला लगावला.

Updated : 26 March 2023 8:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top