पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवरून वाद सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर वक्तव्य केलं आहे.
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पदवीवरून वाद सुरु असतानाच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या पदवीच्या वादावर भाष्य केलं आहे. ते नवी मुंबईतील (Navi Mumbai Kharghar) खारघर येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. कारण अर्थव्यवस्था (Indian Economy) ढासळत असताना त्यांनी देशाला पुढे नेले आहे. 370 (Artical 370 removed) हटवलं आहे. त्यामुळे माणूस डिग्रीने नाही तर कर्माने मोठा होतो, असं मत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा काय आहे वाद?
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind kejariwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची माहिती मागवण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज केला. त्यावर माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती मागवली. मात्र माहिती आयुक्तांच्या आदेशाविरोधात गुजरात विद्यापीठाने (Gujrat University) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गुजरात उच्च न्यायालयाने माहिती देण्यास नकार देत अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निकाल देत 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे हा वाद आणखी वाढला.
देशातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांची डिग्री फेक (Fake Degree) असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी काही महत्वाचे कारण आहेत. ते पुढीलप्रमाणे-
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2005 मध्ये दिलेल्या मुलाखतीत आपलं फक्त शालेय शिक्षण झाल्याचं म्हटलं आहे. मग शालेय शिक्षण झाल्याचं सांगणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्याकडे 1983 सालची पदवी कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
2) पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर मायक्रोसॉफ्टने (Microsoft) तयार केलेला फॉन्ट दिसत आहे. हा फॉन्ट मायक्रोसॉफ्टने 1992 मध्ये तयार केला. जर हा फॉन्ट मायक्रोसॉफ्टने 1992 मध्ये तयार केला असेल तर पंतप्रधान मोदी यांच्या 1983 च्या पदवीवर हा फॉन्ट कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी यांची पदवी नव्या संसद भवनच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावी, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माणूस पदवीने नाही कतृत्वाने मोठा असतो, असं म्हटलं आहे.