ED raid on Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या घरावर ED चा दुसऱ्यांदा छापा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोन महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा छापे पडले आहेत.
X
ED raid on Hasan Mushrif Home : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील (KDCC Bank) कर्ज वाटपातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर दोन महिन्यात दुसऱ्यांदा धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दिली होती. त्यानंतर ईडीने 11 जानेवारी रोजी हसन मुश्रीफ यांच्या कागल (Kagal) आणि पुण्यातील (Pune House) घरावर छापे टाकले होते. त्यावेळी काही कागदपत्रं जप्त केले होते. त्यानंतर पुन्हा दोन महिने पूर्ण होताच ईडीच्या पथकाने हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर छापे मारले आहेत. मात्र हा हसन मुश्रीफ यांना अडचणीत आणण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे लेखापरीक्षण करण्यासाठी विभागीय सहनिबंधक डी. टी छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने काही साखर कारखाने आणि कंपन्यांना कर्ज दिले आहे. त्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या दोन कंपन्या असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यातच ईडीच्या छाप्यामुळे मुश्रीफ यांचे टेन्शन वाढले आहे.