Home > Politics > मोदींच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तुंचा लिलाव, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या साहित्याला कोट्यवधींचा भाव

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तुंचा लिलाव, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या साहित्याला कोट्यवधींचा भाव

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तुंचा लिलाव, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या साहित्याला कोट्यवधींचा भाव
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मिळालेल्या विविध 1300 वस्तुंच्या लिलावाला सुरूवात झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव घेण्यात आला. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर अंतिम सामना खेळताना वापरलेली साधनं भेट म्हणून दिली होती. त्यांचाही लिलाव करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक किंमत ही ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवणाऱ्या लवलिना बोरगोहेन हिच्या बॉक्सिंग ग्लोव्ह्जना मिळाली आहे. या ग्लोव्हजची बेस प्राईस 80 लाख रुपये ठेवण्यात आली होती, पण लिलावात या ग्लोव्हजना 1 कोटी 92 लाख रुपये बोली लावण्यात आली. तर सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरज चोप्रा याच्या भाल्याला 1 कोटी 50 लाख रुपये भाव मिळाला आहे. तर परालम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिऴणाऱ्या सुमित अन्टील याच्या भाल्याला 1 कोटी 7 लाख रुपये मिळाले आहेत.



या लिलालावत 1300 वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये टोकीय ऑलिम्पिक विजेत्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या स्टोलचा समावेश आहे. महिला आणि पुरूष हॉकी संघाने वापरलेल्या हॉकी स्टिक्स, पीव्ही सिंधूची सही असलेली बॅडमिंटन रॅकेट या वस्तुंचा समावेश आहे. तर पंतप्रधान मोदींना योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या राम मंदिराची प्रतिकृती, चारधामची लाकडी प्रतिकृती, रुद्राक्ष कन्व्हेंशन सेंटरची प्रतिकृती, कारगिल युद्धाला 20 वर्ष झाल्यानिमित्त भेट म्हणून देण्यात आलेली मशाल प्रतिकृती या भेटवस्तुंचा समावेश आहे. या ई लिलावामधून जमा झालेला निधी गंगा स्वच्छतेसाठीच्या नमामी गंगे अभियानासाठी दिला जाणार आहे.




Updated : 17 Sept 2021 7:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top