गृहमंत्री वळसे पाटील राज ठाकरेंवर कारवाई करणार ? वळसे पाटील यांचे महत्वपूर्ण विधान
X
राज ठाकरे(Raj thackrey) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिल्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.
वळसे पाटील म्हणाले मी उद्या मुंबईत जाणार आहे.त्यावेळी मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करेन.तोपर्यंत औरंगाबाद पोलिसांचा अहवाल प्राप्त होईल.चर्चेनंतर राज ठाकरे यांच्यावर कारवाई होणार की नाही,याचा निर्णय घेतला जाईल,असे वळसे पाटील यांनी स्पष्ठ केले.
औरंगाबाद(Aurangabad) पोलिसांनी जवळपास १६ अटींवर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला परवानगी दिली होती.या नियमांचे पालन होते की नाही,हे पाहण्यासाठी सभेच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.त्यानंतर औरंगाबाद पोलिस राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहणार आहेत.अटी आणि शर्तींचे कुठे उल्लंघन झाले की नाही ,हे बघतील. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन औरंगाबाद पोलिस या सगळ्याचा अहवाल वरिष्ठांकडे सोपवतील.त्यानंतर राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होईल की, नाही याचा निर्णय घेतला जाईल.
दरम्यानच्या काळात माझं सर्व समाजाला आवाहन आहे की, हिंदू, मुस्लीम किंवा अन्य कोणत्याही धर्माचे लोक असोत त्यांनी समाजात शांतता ठेवण्याचे काम करावे. कोणी कितीही तापवातापवी आणि पेटवण्याचे काम केले तर त्यांना साथ देऊ नका. या सगळ्या वादात सरकार निश्चितपणे योग्य निर्णय घेईल, असे सांगत वळसे-पाटील यांनी जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.