सरकारी ऑफिस कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही – देवेंद्र फडणवीस
X
भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या एका नवीन वादात अडकले आहेत. सोमय्या हे मंत्रालयातील एका कार्यालयात सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चावर बसल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यामुळे सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी होते आहे. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांचे समर्थन केले आहे, तसेच सोमय्या यांना बसण्याचा अधिकार आहे, असा दावा केला आहे. पण यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाषा घसरलेली दिसली.
"या सरकारचे डोकं फिरलेले आहे. अण्णा हजारेंच्या प्रयत्नांनी नागरिकांना माहितीच्या अधिकार मिळालेला आहे. तसेच सरकार कार्यालयात जाऊन त्यात खुर्चीवर बसून तिथले कागद पत्रे तपासण्याचा अधिकारही आहे, " असा दावा त्यांनी केला आहे. "शासकीय कार्यालय कोणाच्या बापाचा नाही, मी जाणूनबुजून एवढे कडक शब्द वापरत आहे. शासकीय कार्यालय जणू यांच्या बापाच्या मालकीचे आहे" असे वक्तव्यही फडणवीस यांनी केले आहे. तसेच किरीट सोमय्या यांचा फोटो काढणारेच तक्रारदार आहेत, हे त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये दिसते आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.