आमचं मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि बारामती ही महाराष्ट्रातच येते – देवेंद्र फडणवीस
X
देशातले अनेक गड उध्वस्त झालेत तसंच बारामतीचा गडही आम्ही २०२४ ला जिंकू या चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सुचक प्रतिक्रीया दिली आहे. भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि बारामती हे महाराष्ट्रातच आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी पुणे (Pune)दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र भाजपचे (bjp)नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. "मी कोणत्याही राजकीय दौऱ्यावर आलेलो नाही. रामोशी समाजातील स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने मी येथे आलो आहे. आमचं सध्या मिशन महाराष्ट्र सुरू आहे. मिशन इंडीया सुरू आहे. आणि बारामती हे शहर महाराष्ट्रातच येतं. ते काही राज्याबाहेर नाही." असं म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
बारामतीचा गड आम्ही २०२४ ला जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी, "बारामती हा पवारांचा गड मानला जातो. परंतू देशात असे अनेकांचे गड आतापर्यंच उध्वस्त झाले आहेत. बारामतीचा गडही भाजप २०२४ ला जिंकेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप बारामतीची जागा २०२४ ला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणेस. बारामतीमधील ४५ टक्के अजुनही उपेक्षितच आहे. त्या उपेक्षित बारामतीकरांसाठी आम्हाला बारामतीची जागा जिंकायची आहे. तसेच देशात २०२४ ला ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा मानस असल्याचे देखील ते म्हणाले.