मराठी बांधवांच्या सोबत सरकार आहे : देवेंद्र फडणवीस
X
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर विधानपरिषद सभागृहात चर्चा रंगली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पहिल्यांदाच राज्याराज्यातील वादात केंद्रिय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला .सीमावादावर झालेल्या केंद्रीय बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली ,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे ट्विट्स प्रक्षोभक असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे पण त्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी माझं ट्विटर हँडल मी चालवत नाही असं सांगितल...यावर तपास सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
"आमच्या मराठी बांधवांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे ,ज्याला कर्नाटक सरकारने विरोध केला.यातुन लाठीमार होतो ,तसेच तुरुंगात टाकलं जातं " त्या सर्व मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सीमावर्ती भागातील गावांकर्ता विशेष योजना नाहीयत .त्यामुळे ते विकासाच्या मागे आहेत असं त्यांना वाटत .पण त्यासंदर्भात विशेष कार्यक्रम सरकार हाती घेईल.असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र किंवा कर्नाटक मधल्या विषयासंदर्भात कोर्टात एक बेंच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . त्यामध्ये महाराष्ट्र किंवा कर्नाटकचे सदस्य नसतील अशी स्पष्टता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे .