Home > Politics > Big Breaking : मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Big Breaking : मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Big Breaking : मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
X

राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारच्या मंत्रीमंडळात वर्णी लागल्याची अटकळ अनेक राजकीय विश्लेषकांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बांधली होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले होते. त्यातच हा मंत्रीमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापुर्वी होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापुर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक वाढताना दिसली होती. त्यातच दिवाळीच्या वेळीही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले होते. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत राज ठाकरे हे भाजपसोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच मनसे आणि भाजप युती झाल्यास राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी अटकळ अनेक राजकीय विश्लेषकांनी बांधली होती. दरम्यान राज ठाकरे यांनी बारसू प्रकल्पावरून आणि त्यानंतर नोटबंदीच्या निर्णयावरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे जुळण्यास सुरुवात झालेले सूर पुन्हा तुटणार की काय? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरु लागली आहे. त्यामुळे या विस्तारात राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे किंवा मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीवरून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.


Updated : 29 May 2023 11:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top