Home > Politics > पहाटेचा शपथविधी ही खेळी- जयंत पाटील

पहाटेचा शपथविधी ही खेळी- जयंत पाटील

पहाटेचा शपथविधी ही खेळी- जयंत पाटील
X

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पहाटेचा पार पडलेला शपथविधी ही एक खेळी असल्याचा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांचीच खेळी असल्याचा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पहाटेचा शपथविधी ही खेळी असू शकते असेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी या खेळीची मदत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं टाळलं आहे. आज राजकीय काहीही बोलणार नसल्याचे सांगत फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे टाळले. गेल्या ३ वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली होती. २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राजभवनातील या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती.

नेमके जयंत पाटील काय म्हणाले?

तीन वर्षापूर्वी राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. ही शरद पवारांची खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेच्या शपथविधीची खेळी ही जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही. मात्र राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास या शपथविधी मुळे मदत झाली. त्या शपथविधीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली, असं जयंत पाटील म्हणाले.

या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही- चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटाला काहीही अर्थ नसल्याचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीला उशिरा सूचलेले हे शहाणपण असल्याचे पाटील म्हणाले, मात्र याला काहीच अर्थ नाही, कुणी काय म्हणते याला जास्त गांभिर्यांने घ्यायचे नसते, असं सुद्धा चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

पहाटेचा शपथविधी ही खेळी- जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा हे आजही छुप्या पद्धतीने भाजपसोबत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर अजित पवार यांची एक मुलाखत छापून आली होती. त्यामध्ये त्यांनी आमचे हे ठरले होते, लोक मला का दोष देत आहेत, हे मला समजत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Updated : 26 Jan 2023 6:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top