देवेंद्र फडणवीस यांच्या भावाचे टीकाकारांना उत्तर...
X
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. त्यांना विरोधक आणि सोशल मीडियावर देखील विविध शब्दांमध्ये ट्रोल केले जाते. भाजप नेत्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील कायम देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला उत्तर देत असतात. पण आता राज्यसभा निवडणुकीती विजयानंतर देवेंद्र फ़डणवीस यांचे भाऊ संजय फडणवीस यांनी पहिल्यांदाच टीकाकारांना उत्तर दिले आहे. संजय फडणवीस यांनी ट्विट केले आहे, " तुम्ही त्याला टरबूज बोला, त्याला तुम्ही अनाजीपंत बोला, तो नेहमीच शांत असतो. तुम्ही तुमच्या लायकी प्रमाणे कसही वागा, पण तुम्ही त्याच्या बुद्धिशी कधीच बरोबरी करूनच दाखवावी #मलात्याचाभाऊअसल्यचाअभीमान_वाटतो"
तुम्ही त्याला टरबूज बोला, त्याला तुम्ही अनाजीपंत बोला, तो नेहमीच शांत असतो. तुम्ही तुमच्या लायकी प्रमाणे कसही वागा, पण तुम्ही त्याच्या बुद्धिशी कधीच बरोबरी करूनच दाखवावी#मला_त्याचा_भाऊ_असल्यचा_अभीमान_वाटतो pic.twitter.com/gR6XpNsEnn
— SANJAY FADNAVIS (@sanjayfadnavis1) June 11, 2022
असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जाते आहे. तसेच फडणवीस यांनीही २०२४ मध्ये भाजप बहुमताचे सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्याला शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. "एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही.१०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही." विरोधकांच्या याच टीकेला फडणवीस यांच्या भावाने उत्तर दिले आहे.