Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, आमच्याकडे एकही मत नसताना...

देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, आमच्याकडे एकही मत नसताना...

देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, आमच्याकडे एकही मत नसताना...
X

विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या अचूक नियोजनाच्या जोरावर भाजपने महाविकास आघाडीला (mahavikas aghadi) धक्का दिला आहे. भाजपकडे(bjp) १०६ मतं असताना १३४ मतं मिळवत महाविकास आघाडीची मतं फोडण्यात फडणवीस यांना यश आले आहे. पण या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांना एक गौप्यस्फोट केला आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्याकरीता भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नव्हते, तरीही आम्ही विजय मिळवला आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्य़मांशी संवाद साधला. प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या रुपाने पाचवी जागा निवडून आणण्याकरीता भाजपकडे एकही मतदार नव्हता, पण तरीही लाड यांना काँग्रेसच्या (Congress) दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली, एवढेत नाही तर भाजपच्या सर्वच उमेदवारांना जास्त मतं मिळाली, असे त्यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीत १२३ मतं मिळाली होती आता आम्ही १३४ मतं मिळवली आहेत, असे सांगत आपण आधीपासूनच महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड नाराजी आहे, असा दावा केला होता. तसेच सरकारमधील पक्षांमध्ये समन्वय नसल्याने सरकारमधील आमदारांचाच सरकारवर विश्वास नाही, असा दावाही त्यांनी केला. तसेच त्याचमुळे सत्ताधारी पक्षातील आमदार आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून बाजपच्या पाचव्या उमेदवाराला मतं देतील, असे आवाहन केले होते आणि त्याप्रमाणे झाले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकारच्या अंताची ही सुरूवात आहे का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारला तेव्हा सरकार स्थापन झाले तेव्हापासुनच ही सुरूवात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप काय भूमिका घेतो याबाबत आता उत्सुकता आहे.


Updated : 21 Jun 2022 6:46 AM IST
Next Story
Share it
Top