Home > Politics > दिल्लीत भाजपचे ऑफरेशन लोटस फेल, केजरीवाल यांचा दावा

दिल्लीत भाजपचे ऑफरेशन लोटस फेल, केजरीवाल यांचा दावा

दिल्लीत भाजपचे ऑफरेशन लोटस फेल, केजरीवाल यांचा दावा
X

दिल्ली सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे ऑपरेशन लोटस फेल गेल्याचा दावा केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची CBI कडून चौकशी झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपने रान पेटवले होते. त्यातच दिल्लीचे राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी केजरीवाल सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस फेल ठरल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते विश्वासदर्शक ठरावावर बोलत होते.

यावेळी बोलताना केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. यामध्ये केजरीवाल म्हणाले की, देशात महागाई वाढली आहे. खाण्याच्या वस्तूपासून ते सर्वच गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी एका वेळची भाजी खरेदी करणे बंद केले आहे. ते मीठ मिरचीसोबत जेवण करतात. मात्र दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांनी आपल्या बड्या उद्योगपती मित्रांचे दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहेत. कुणाचे पाच हजार कोटी, कुणाचे दहा हजार कोटी, तर कुणाचे पंधरा हजार कोटींचे कर्ज माफ केले जात आहे.

दुसरीकडे दिल्ली सरकार जनतेसाठी काम करत असताना सरकारवर आरोप केले जात आहेत. जर केंद्र सरकारने आपल्या मित्रांना दिलेले कर्ज वसूल केले तरी देशातील महागाई संपुर्णपणे नष्ट होईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

यावेळी केंद्र सरकार आपल्याकडील तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले. मात्र या यंत्रणांच्या गैरवापरानंतरही दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस फेल ठरले आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

Updated : 29 Aug 2022 12:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top