18 महापालिकेत 'एक प्रभाग एक नगरसेवक' चा निर्णय
X
पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील 18 महानगरपालिकांमध्ये 'एक प्रभाग एक नगरसेवक' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी महानगरपालिकांमध्ये एक प्रभाग चार नगरसेवक अशी पद्धत होती,मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता 'एक प्रभाग एक नगरसेवक' अशी पद्धत लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे.
राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवडसह ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद,मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, भिवंडी-निजामपूर, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महापालिका निवडणुकामध्ये 'एक प्रभाग एक नगरसेवक' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहे. महापालिका निडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत, सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, मोर्चेबांधणी सुरू केली आहे.