राहुल गांधींचं 'हे' ट्रॅक्टर दिल्लीत आलं कसं? अमित शहा यांचं गृह खातं पण आवाक…
राहुल गांधी यांचा ट्रक्टर चालवण्याचा फोटो तुम्ही पाहिला असेल, मात्र, संसदेचं अधिवेशन सुरु असताना सुरक्षा यंत्रणांच्या चोख बंदोबस्तात हे ट्रॅक्टर संसदेत पोहोचलंच कसं? वाचा...
X
राहुल गांधी (Rahul Gandhi Tractor Rally) संसद भवनात ट्रॅक्टर चालवत असल्याचा फोटो सोशल मीडियासह अनेक वृत्तपत्रात पाहिला असेल. मात्र, कोरोना काळात आणि संसदेचं अधिवेशन सुरु असताना एवढ्या मोठ्य़ा प्रमाणात सुरक्षा यंत्रणा सतर्क केली असताना देखील संसदेपर्यंत हे ट्रॅक्टर पोहोचलं कसं? याचा तपास अमित शहा याचं गृहखातं करतंय.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली च्या विविध सीमांसह जंतर मंतर वर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि सरकारचा निषेध म्हणून राहुल गांधी 26 जुलै ला सोमवारी ट्रॅक्टर चालवत संसदेमध्ये दाखल झाले होते.
दिल्ली पोलिसांच्या मते हे ट्रॅक्टर दिल्ली मध्ये कंटेनरमध्ये टाकून आणण्यात आले. त्यासाठी एका खासदाराने पत्र दिलं होतं. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर च्या या प्रकरणात अनेक कलमं लावून कॉंग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ट्रॅक्टर आणि कंटेनर मालकाला आता नोटिस पाठवली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीच्या आधारे NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार हे ट्रॅक्टर एका खासदाराच्या पत्रानुसार दिल्लीत आलं. या खासदाराने आपल्या घरातील सामान दिल्ली येथे आणायचं आहे. असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, या कंटनेरमध्ये ट्रॅक्टर आणण्यात आलं. याची खबर देखील पोलिसांना लागली नाही.
ट्रॅक्टर आणि कंटेनर चे मालक हरियाणा तील सोनीपत चे रहिवाशी आहेत. ट्रॅक्टर चा मालक सोनीपत च्या बिंदरौली गावचा रहिवाशी आहे. ज्या कंटेनर मध्ये ट्रॅक्टर आणण्यात आलं होतं. ते कंटनेर सोनीपत च्या बाडखालसा भागातील एका व्यक्तीचं आहे.