कोण तो हरामखोर बीडीओ,कार्यालयात जाऊन फटके मारू;अनिल बोंडेंचं वादग्रस्त विधान
X
भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. गटविकास अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊन फटके मारू असं विधान बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून आता पुन्हा नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे. अधिकारी मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर, स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू अस वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या एका आंदोलनात बोलतांना बोंडे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्याला कार्यालयात येऊन मारण्याची उघडपणे धमकी देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.