वादग्रस्त राज्यपालांची वादग्रस्त कारकीर्द
राज्यपालांनी राजकीय नाही तर संविधानिक जबाबदारी पार पाडावी, अशी टिपण्णी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर राज्यपालांच्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात राज्यपालांच्या वादग्रस्त कारकीर्दीबाबत भरत मोहळकर यांचा explainer....
X
राज्यपालांनी राजकीय नाही तर संविधानिक जबाबदारी पार पाडावी, अशी टिपण्णी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर राज्यपालांच्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात राज्यपालांच्या वादग्रस्त कारकीर्दीबाबत....
1) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh koshyari)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. राज्यपालांनी मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने काम करायचे असते. मात्र भगतसिंह कोश्यारी यांनी हे निकष पायदळी तुडवल्याचे म्हटले जाते. मंत्रीमंडळाने शिफारस करूनही भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्तीच केली नाही. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीच्या वतीने टीका करण्यात येत होती. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit pawar) यांना पहाटेच शपथ दिली होती. त्याबरोबरच राज्यपालांनी महापुरुषांबद्दल जपून बोलणे आवश्यक असते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (savitribai Phule) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबरोबरच मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती लोक वजा केले तर मुंबईत पैसाच उरणार नाही, अशी टिपण्णी कोश्यारी यांनी केली होती. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली.
2) तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी ( RN Ravi)
तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्यात आणि स्टॅलिन (RN Ravi Vs Stalin government) सरकारमध्ये वाद सुरु आहे. तामिळनाडूचे (Tamilnadu) नाव बदलून तमिगझम करण्याची मागणी रवी यांनी केली आहे. एवढच नाही तर तमिळ, द्रविड, द्रविड विचारधारा आणि तामिळनाडू याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. याबरोबरच राज्यपालांनी सरकारने दिलेले अभिभाषण न वाचता त्यातील काही मुद्दे वगळल्याने वाद निर्माण झाला होता.
3) केरळचे राज्यपाल मोहम्मद खान (Mohammad khan)
केरळचे राज्यपाल मोहम्मद खान आणि केरळमधील डावे सरकार यांच्यात शासकीय नियुक्तीवरून वाद सुरु आहे. जन्मभुमी या दैनिकाचे माजी संपादक हरी एस करथा यांची राज्यपालांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला. त्यानंतर राज्यपालांनी अभिभाषणाच्या फाईलवर सही करण्यास नकार दिला, त्यामुळे केरळमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.
4) जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad)
जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यावेळी ममता बॅनर्जी विरुध्द जगदीप धनखड (Mamata Banargee Vs Jagdeep Dhankhad) वाद रंगल्याचे पहायला मिळाले. त्यातच जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीला विधीमंडळ अधिवेशनाबद्दल पाठवलेला ठराव परत पाठवला. हा ठराव राज्यघटनेतील नियमाला धरुन नसल्याचे सांगत जगदीप धनखड यांनी हा ठराव परत पाठवला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांच्यावर सडकून टीका केली.
5) नजीब जंग (Najib Jang)
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांची पुर्व संमती न घेता कारागृह महासंचालक पदाची नियुक्ती केली. त्यावरून केजरीवाल सरकार विरुध्द उपराज्यपाल नजीब जंग (Arvind Kejariwal Vs Najib Jang) यांच्यात खडाजंगी झाली होती. याबरोबरच अनेक वेळा उपराज्यपाल सहकार्य करीत नसल्याचा आरोप केजरीवाल यांच्याकडून करण्यात येत होता.
6) अनिल बैजल (Anil Baijal)
नजीब जंग यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून नजीब जंग यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नजीब जंग यांच्यापाठोपाठ उपराज्यपाल अनिल बैजल विरुध्द केजरीवाल यांच्यात संघर्ष रंगल्याचे पहायला मिळाले.
7) रमेश बैस (Ramesh Bais)
रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. त्यावेळी त्यांच्यात आणि हेमंत सोरेन सरकारमध्ये अनेकदा खटके उडाल्याचे समोर आले. त्यामुळे रमेश बैस यांची कारकीर्दही वादग्रस्त ठरली.