Home > Politics > मजुरांना मदत करणे हा गुन्हा असेल तर, तो गुन्हा काँग्रेसने केला आहे"- विजय वडेट्टीवार

मजुरांना मदत करणे हा गुन्हा असेल तर, तो गुन्हा काँग्रेसने केला आहे"- विजय वडेट्टीवार

मजुरांना मदत करणे हा गुन्हा असेल तर, तो गुन्हा काँग्रेसने केला आहे- विजय वडेट्टीवार
X

कॉंग्रेसमुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्याची वाढ झाली. राज्यातील मजुरांना स्वतच्या राज्यात जाण्यासाठी दबाव टाकला गेला.स्थलांतरीत मजुरांमुळे उत्तरप्रदेशात कोरोना रुग्णसंख्या वाढली,असे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना असा आरोप केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आता राज्यभरात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज राज्यभरातील भाजपच्या कार्यालयांसमोर काँग्रेस आंदोलन करत आहे.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आलं.पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

"महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारं राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केलं, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे". असे पटोले म्हणाले.

"मजुरांना मदत करणे हा गुन्हा असेल तर, तो गुन्हा काँग्रेसने केला आहे. राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनातून केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

Updated : 9 Feb 2022 1:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top