"... पंतप्रधानांचाही चार्ज दुसऱ्या नेत्यांकडे द्या" ; नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
X
मुंबई : आजपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा चार्ज इतर कुणाकडे द्यावा असं वक्तव्य केलं. यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भाजपणे आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच उपस्थित नसतात, त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्या, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
याबाबत माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे. ते अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणार आहेत आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. परंतु विरोधक मात्र , विनाकारण त्यावरून राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा लोकसभा व राज्यसभेत उपस्थित नसतात त्याची माहिती भाजपाने आधी घ्यावी व नंतर बोलावे. पंतप्रधानही सभागृहात नसतात मग त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्यावा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चार्ज कुणाला तरी द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाही, हे स्वाभाविक आहे. कारण त्यांनी चार्ज घेतला तर सोडणारच नाही.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यावा.
तर पुढे बोलताना चंद्रकातं पाटील म्हणाले की, रश्मी ठाकरे यांच्याकडे थेट चार्ज देता येणार नाही. आधी त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. ज्याने शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीकडे चार्ज द्यावा लागतो. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. दरम्यान , यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.