उ.प्रदेशात प्रियंका गांधींचा मोठा निर्णय, उन्नाव प्रकरणातील पीडितेच्या आईला उमेदवारी
X
उ. प्रदेशातील निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी यांनी लडकी हूं लड सकती हूं अशी घोषणा देत महिलांना हाक दिली आहे. त्यात आता काँग्रेसने आणखी आक्रमक भूमिका घेत योगी आदित्यनाथ यांच्या काळात अन्याय झालेल्या पीडित महिला आणि तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय़ घेतला आहे. यानुसार उन्नाव बलात्कार प्रकरणातील मृत तरुणीच्या आईला उमेदवारी देण्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. आशा सिंग ह्या उन्नावमधून निवडणूक लढतील असे प्रियं प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदते स्पष्ट केले.
काँग्रेसने गुरूवारी उ. प्रदेश निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गोंड आदिवासींच्या हक्काच्या जमिनीसाठी लढणाऱ्या रामराज गोंड यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तर पूनम पांडे ह्या आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलेलाही उमेदवारी देण्यात आली आहे. उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भेटण्याचा प्रयत्न केला म्हणून पूनम पांडे यांना पोलिसांनी मारल्याचा आरोप आहे. तर CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या सदर जफर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. CAA प्रकरणी जफर यांना तुरुंगात देखील डांबण्यात आले होते.
उन्नाव में जिनकी बेटी के साथ भाजपा ने अन्याय किया, अब वे न्याय का चेहरा बनेंगी- लड़ेंगी, जीतेंगी!#Election2022
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 13, 2022
"जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांपैकी ४० टक्के महिला उमेदवार आहेत तर ४० टक्के तरुण उमेदवार आहेत. या ऐतिहासिक निर्णय़ाने राज्यात नवीन राजकारण सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे" अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मांडली.