काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
X
मुंबई : काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर येत्या 29 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सातव हा अर्ज दाखल करण्यात आला.
दरम्यान दिवंगत शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते