मुख्यमंत्र्यांच्या PAने बाबरी विध्वंसाचा फोटो शेअर करत शिवसैनिकांना केले वंदन
X
आज ६ डिसेंबर....बाबरी विध्वंसाचा दिवस...देशाच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून याचा उल्लेख केला जातो. राम मंदिरासाठी बाबरी मशीद पाडण्यात आल्याचा दावा समर्थक करत असतात. या घटनेला आता जवळपास ३० वर्ष होत आली आहेत. "बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे," असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर टीका करताना बाबरी विध्वंसाची जबाबदारी शिवसेनेने घेतली पण भाजपने घेतली नाही, अशी टीका केली होती.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
आता याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे खासगी पीए मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी विध्वंसाचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असे म्हटले आहे. भाजपला सर्व बाजूने घेरण्याची शिवसेनेची रणनीती असताना आता राम मंदिराच्या मुद्द्यावरुनही शिवसेनेनं श्रेय घेण्याचा प्रयत्न यामधून केल्याची चर्चा सुरू झाली आहे. राम मंदिराचे संपूर्ण श्रेय़ घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असताना शिवसेनेनं भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचे दिसते आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए आहेत. तसेच नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या लौकांपैकी एक समजले जातात.