मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्याची वेळ – चंद्रकांत पाटील
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाहीये, पण राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागत नसल्याने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे तरी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आपल्या संस्कृतीत एकमेकांच्या प्रकृतीवर टीका करणं योग्य मानत नाहीत कारण तब्येत कोणत्याही व्यक्तीच्या हातात नसते. कुणी व्यक्ती शत्रू जरी असेल तरी असे बोलत नाहीत. मग उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पण मुख्यमंत्र्यांची प्रक़ृतीचा प्रश्न दीर्घकाळ असेल त्यांनी इतर कुणाकडे चार्ज द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असताना त्यांनी राजेश टोपे यांना पाठवले, पण देशातली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तिथे असताना, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला संधी मिळणार नव्हती, पण मुख्यमंत्री स्वत: उपस्थित राहिले असते तर ते पंतप्रधानांचे चांगले मित्र असल्याने पंतप्रधान मोदी त्यांना चारवेळा मत देखील विचारतात, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
राज्याचे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नसतत, घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन पुरेसे नाही, नाहीतर इतर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.