Home > Politics > राज्यात पुन्हा युतीचे सूर, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या...

राज्यात पुन्हा युतीचे सूर, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या...

राज्यात पुन्हा युतीचे सूर, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या...
X

भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकार कोसळणार अथवा सरकार कोसळेल अशा आशयाचं विधान माध्यमांशी बोलताना करत असतात. असंच एक विधान माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका कार्यक्रमात केलं होतं.

'सूत्रसंचालकाने दोन-तीनवेळा चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री असं संबोधलं. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल. असं सूचक वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संभाव्य युती संदर्भात वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा उल्लेख "मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी" असा केला. तसंच पुढं बोलताना ते म्हणाले माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

मात्र, या सर्व भाषणामध्ये दानवे यांचा मुख्यमंत्र्यांनी भावी सहकारी उल्लेख केल्यानं संभाव्य युतीची चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांच्या या विधानानं राज्याच पुन्हा एकदा युतीचे सूर जुळत असल्याची चर्चा आहे.

Updated : 17 Sept 2021 1:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top