Home > Politics > शिंदे गटातील आमदारांमध्ये पुन्हा ठिणगी, मंत्री पदासाठी रस्सीखेच

शिंदे गटातील आमदारांमध्ये पुन्हा ठिणगी, मंत्री पदासाठी रस्सीखेच

शिंदे गटातील आमदारांमध्ये पुन्हा ठिणगी, मंत्री पदासाठी रस्सीखेच
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये शिवसेनेतील अनेक मंत्री सहभागी झाले यातील एक मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील... त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. पण आता माजी मंत्री गुलाबराव पाटील आणि आणखी एक बंडखोर आमदार चिमणराव पाटील या शिंदे गटातील नेत्यांचा वाद थांबता थांबत नाहीये.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच ते मतदारसंघात आले. पम येताच त्यांनी गुलाबराव पाटील यांनाच लक्ष केले आहे. मतदार संघात परतण्याच्या एक दिवस अगोदारच चिमणराव पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत आता आपण बोलणार नाही मात्र ज्या काही भावना होत्या त्या आपण बोललो असल्याचं चिमणराव पाटील यांनी मान्य केले.

त्यांनी अप्रत्यक्षपणे गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री , पालकमंत्री असूनही आपल्या मतदार संघातील महत्वाचे प्रकल्प जाणूनबुजून अडवण्यात आल्याचा आरोप चिमणराव पाटील यांनी केलाय.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वात जुने नेते असल्याने मंत्रीपदापासून डावल्याने चिमणराव पाटील हे ठाकरे सरकारवर नाराज होते. शिंदे सरकार आल्याने गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच आहे. मॅक्समहाराष्ट्रला बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी दिलेल्या Exlusive मुलाखतीत गुलाबराव पाटील यांच्यावरील नाराजी आणि मंत्रीपदाबाबतची अपेक्षा व्यक्त केलीय.

Updated : 9 July 2022 12:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top