Home > Politics > अखेर शिंदे सरकारच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहिर!

अखेर शिंदे सरकारच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहिर!

अखेर शिंदे सरकारच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहिर!
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कुठे आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, मंत्री मंडळ जाहिर झाल्यानंतर जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत असा सुर विरोधकांनी लावला होता. अखेर त्यांच्या या प्रश्नाला सरकारनं बऱ्याच कालावधीनंतर उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली खरी पण त्यात सर्वाधिक जिल्ह्यांचे म्हणजेच तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री हे एकटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. शिवाय नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

कोणाकडे कोणता जिल्हा?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर,नांदेड,

गुलाबराव पाटील - बुलढाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर - मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,


Updated : 24 Sept 2022 8:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top