बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाहीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उध्दव ठाकरे यांना उत्तर
गुरूपौर्णिमेनिमीत्त ट्वीट करून एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
X
राज्यातील सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि मातोश्रीशी प्रतारणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवं ट्वीट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड करून भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, असं म्हणत ट्वीट केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन.
एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोचे ग्राफिक्स ट्वीट केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार असल्याचा आणि मातोश्री व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी हे प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.