Home > Politics > शिंदे-फडणवीस यांचे दिल्ली दौरे कशासाठी? अखेर फडणवीस यांनी केला खुलासा

शिंदे-फडणवीस यांचे दिल्ली दौरे कशासाठी? अखेर फडणवीस यांनी केला खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याला अखेर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

शिंदे-फडणवीस यांचे दिल्ली दौरे कशासाठी? अखेर फडणवीस यांनी केला खुलासा
X

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौरे करत असल्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. तर महाराष्ट्राचे निर्णय दिल्ली घ्यायला लागल्याचेही म्हटले जात होते. त्यावर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.ते मुंबई भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे लोक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत निवडून आले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न धुळीस मिळवले. त्याबरोबरच सत्ता मिळाल्यानंतर ते लोक इतके आत्ममग्न झाले की त्यांनी मुंबईकरांकडे बघितलेही नाही. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आणि जनतेच्या मनातील मुंबई साकारण्याची जबाबदारी आपली असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 25 वर्षांचा भ्रष्टाचाराचा विळखा दूर करून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवेल, असा निर्धार व्यक्त केला.

मुंबई दिल्लीपुढे झुकणार नाही

निवडणूका आल्या की ठाकरे यांच्याकडून मुंबई भाजपला तोडायची आहे. मुंबई दिल्लीपुढे झुकणार नाही, अशी भावनिक वक्तव्ये केली जातील. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई तोडायची हिंमत कुणाच्यातच नाही. दिल्ली देशाची राजधानी आहे. पण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दिल्लीला गेलो की, महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकल्याची टीका केली जाते. मात्र मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि त्याआधीही आणि नंतरही काँग्रेसचे मुख्यमंत्री दिल्लीला जात होते. एवढंच नाही तर उध्दव ठाकरे हे सुध्दा सोनिया गांधी यांच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी दिल्लीला गेले होते, अशी टीका फडणवीस यांन केली.

तसेच आमच्या दिल्लीभेटी या मुंबईच्या विकासासाठी असल्याचे मतही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Updated : 21 Aug 2022 10:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top