मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला रक्त लागंल ; ते खोटारडे : संजय राऊत
X
केंद्रीय यंत्रणाचा वापर करायचा हे बेफाम काम सुरू आहे. महाराष्ट्रात पोलिस यंत्रणाचा वापर करणे सुरू आहे. कर्नाटक, दिल्ली बिहार पश्चिम बंगाल अशा राज्यात हे काम सुरू आहे. निवडणुका जशा जवसाजवळ येतात कारवाई वाढत आहे असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शिक्षण मंत्री म्हणून खुप चांगले काम केले. जगाला हेवा वाटेल असे काम केले. ते त्यांचे निर्णय नव्हते ते कॅबीनेटचे आहे. अनिल देशमुख, छगन भुजबळ यांना अशाच निरिणयाबाबत अटक केली. त्याना आबकारी खात्याच्या एका निर्णयासाठी अटक केली.
परवा केजरीवाल आले त्यांनी सांगितले की, आपण धीराने लढायला पाहीजे असे त्यांनी सांगितले. तुमच्या पक्षात काय सगळे संत महात्मे आहेत का? महाराष्ट्रात झाड हलवले तर भ्रष्टाचाराचे शेकडो प्रकरण बाहेर पडतील. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावावर भ्रष्टाचार केला एका दिवसात चौकशी थांबली. का थांबवली? तुमच्या कडे काय सगळे संत महात्मे आहेत का?
तुम्ही जो पायंडा पाडला. तो घातक आहे. दुसऱ्याचे सरकार आले तर तुम्हाला कोण वाचवेल. तुमच्या कडे आलेल्या लोकांना निर्मला वॅाशिंग मशीन मध्ये टाकायचे चौकशी थांबवायचे . मुख्यमंत्र्यांवर आहे. आशिष शेलार यांनी तक्रार दिलाहोती. त्यांच्यावर काय आरोप काय आहे ते पहा. नगरविकास खात्याचे भेरष्टाचार आहे ते पहा. फक्त विरोधकांचे प्रकरण दिसतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
या सगळ्यातून आम्हाला पुढे जायचे पुन्हा नव्याने पक्ष उभा करणे हे महत्वाचे आहे. काल चिन्ह नाही पक्षाचे नाव नाही तरी लोक जमतात इतक्या मोठ्या प्रमाणावर जमतात.जे मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकले नाही. त्यांचे सरकार वैध आहे हे कसे म्हणाल तुम्ही. त्यांना भिती आहे अपात्रतेची त्यामुळे ते विस्तार करत नाही. टांगली तलवार आहे त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची. निवडणुक आयोगाने शेण खाल्ले पण आम्हाला सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण आहे.
मुख्यमंत्री खोट बोलत आहेत. ते गुवाहाटीला जाऊन आल्यापासुन त्यांच्या तोडांला रक्त लागले आहे त्यामुळे ते खोट बोलत आहेत.. उलट आमच्या सरकारने सुडाने कारवाई करायचे नाही असे सांगितले होते. त्यामुळे संथगतीने चौकशी झाले होतेनाही तर अटक करता आली असती. इतके मोठे ते प्रकरण आहे. आयएनएस विक्रांतच महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा झाला. नवे सरकार येताच सगळ्या प्रकरणावर क्लीन चीट दिली.
क्लीन चिट देणे हाच मोठा घोटाळा आहे. कुणी तरी कोर्टात जायला पाहीजे. फडणवीस आणि महाजन यांना अटक करण्या काही विषय नव्हता. तसं असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यात सहभागी होता. तेंव्हा तोंड गप्प करून का बसला होतात. उद्धव ठाकरे अत्यंत संयमी नेतृत्व होते. ते संयमाने काम करत होते, असे त्यांनी सांगितले.