Home > Politics > उद्धव ठाकरे यांच्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे?

उद्धव ठाकरे यांच्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत पहिल्यांदाच हजेरी लावून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच सीमाप्रश्नांबद्दल पेनड्राईव्ह मध्ये डॉक्युमेंटरी आहे. दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवण्यात यावी असे विधान ठाकरे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे?
X

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले असल्यामुळे तिथे सीमाप्रश्न उपस्थित करतील का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आज सभागृहात पेन ड्राईव्ह आणला आहे. त्यात सीमाभागावर डॉक्युमेंटरी असल्याचे म्ह़टलं आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, विरोधकांनी मांडलेल्या सीमाप्रश्नावर एकमत असल्याचं पाहूण मी धन्यवाद बोलतो. सीमाप्रश्नाचा लढा गेल्या ५० वर्षांपासून सुरू आहे.

तेथील स्थानिक नागरिक मराठी भाषा गेल्या अनेक वर्षांपासून बोलत आहेत. हा लढा राजकीय नसल्याने सामाजिक लढा आहे. १९७० च्या दशकात सीमाभागावरील डॉक्युमेंटरी बनवण्यात आली होती. ती या पेन ड्राइव्ह मध्ये आहे. अठराव्या शतकात मराठी भाषा कशी बोलली जाते दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा. तसेच सीमाप्रश्नांचा मुद्दा सुरु असताना मुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाणं योग्य आहे का? महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत असा कायदा केला तर काही लोक कोर्टोत जातात.

मुळातचं आपलं सरकार कर्नाटक सारखी भूमिका मांडणार आहे का? असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चीनचे एजंट संजय राऊत आहेत असं म्हटलं जातंय. नक्की याचा शोध कोणी लावला. असे ठाकरे यांनी आपल्या भाषाशैलीतून विधानपरिषदेत मुददे उपस्थित केले आहेत.बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्याचा ठराव पास केल्यानंतर, कर्नाटकने बेळगावची महापालिका बरखास्त केली. त्यामुळे ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार का? असा प्रश्न विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारला विचारला.

Updated : 26 Dec 2022 2:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top